Posts

Showing posts with the label आठवणींची शिदोरी

अन पुन्हा माणूसकी भेटली.

Image
                                 लहानपणापासून शिकत आलो माणूसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे.. प्रत्येकाने दुसऱ्याशी चांगलेच वागावे.. फार नाही तर निदान आपल्याला जमेल तेवढी मदत गरजूला करावी. कोणाला फसवू नये. तरी कधीकधी लोकांचा मानवतेवरचा विश्वास काहीप्रमाणात कमी होताना दिसत असला तरी संपलेला नाही. काळ बदलत गेला तसा मानवाचे रंग बदलत गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी मानवाला नाती, माणूसकी ह्या सर्व गोष्टी नगण्य वाटू लागल्या. काही प्रमाणात स्वार्थ हा सर्वात मोठा ठरताना दिसतो. आजचा काळ तर ह्या सर्वाची प्रचिती देणारा असला तरी माणुसकी पूर्णतः नष्ट झाली असं म्हणता येणार नाही. आजच घडलेला अनुभव...         ११ ची वेळ.. (अर्थात सद्यस्थितीत रेल्वेच्या नियमावलीनुसार)  सकाळी कामावर जाताना मुंबईकर जसा नेहमी घाईतच असतो; तशी मीही काहीशी घाईतच होते.. ट्रेन मध्ये चढतानाचा अलिखित नियम मुंबईकरांना सवयीचाच आहे. तो म्हणजे स्वतःला आणि सोबतच्या सामानाला नीट सांभाळायचं. आपली बॅग पुढे पकडूनच ट्रेनमध्ये चढायच...

बस...भीती...अन आईचं नेटवर्क...

Image
नमस्कार, बऱ्याच दिवसांनी काही लिहायचा हा छोटासा प्रयत्न... निमित्त होतं ते 'भटकंती महाराष्ट्राची' ने मातृदिन विशेष आयोजित केलेल्या स्पर्धेचं.... स्पर्धा अशी की ' आपल्या आईसोबतची भटकंती/प्रवासाविषयी असलेली आठवण लेखनस्वरूपात पाठवायची' होती... अन आदल्या दिवशी रात्री हे लिखाण केले.. खरंतर झोपेत असल्याने काही चूका असल्यास क्षमस्व.... स्पर्धेसाठी आईसोबतची आठवण हा महत्वाचा मुद्दा असल्याने हा ५ दिवसांचा अनुभव थोडक्यात मांडला आहे... पूर्ण अनुभव मागे लिहिता लिहिता अर्धवट राहून गेला होता पण स्पर्धेनिमित्त का होईना थोडक्यात लिहिता आलं त्यासाठी अन मला ह्या स्पर्धेत  सहविजेती ठरवलं त्यासाठी 'भटकंती महाराष्ट्राची' टीमचे खूप खूप आभार... तर नक्की वाचा... आपल्या सूचना अन प्रतिक्रिया सर्व स्विकारल्या जातील... धन्यवाद.🙏🙏 बस...भीती...अन आईचं नेटवर्क... भटकंती... फिरणं... हे काय असतं... हे जेव्हा आपल्याला समजतही नसतं तेव्हापासूनच खरंतर आपल्या फिरण्याची सुरुवात झालेली असतेच...आणि तीही आपल्या आईमुळेच... हो खरं आहे.. विचार करून बघा..तान्हुल्या जीवाचं पोषण-रक्षण करताना ...

भाऊ- बहीण अन राखी

Image
PC: Google राखी नसतो फक्त धागा नात्यांची वीण घट्ट करणारा... असतो एक बंध नात्यांना बांधणारा.... जवळ असो वा दूर; ही राखीच त्यांना जोडत असते... कारण 'दादा' अन 'ताई'च्या नात्यात भावनांची भेळ असते.... भातुकलीच्या चुलीवरचा चहा अन तव्यावरची गरमागरम  पोळी म्हणजे बहीण असते...तर ईवल्याश्या बॅट ने फुटभर अंतरावर मारलेल्या 'सिक्सर' ची  फुशारकी म्हणजे भाऊ असतो....😛 बालपणी मस्ती करत येताना धडपडून लागलेली जखम आई पासून लपवणारी ती बहीण असते...😎 तर लाईट गेल्यावर अंधाराची भीती घालवण्यासाठी; मेणबत्तीच्या प्रकाशात बसून भूताच्या गोष्टी सांगणारा तो भाऊ असतो...😂😁 लुटूपुटूच्या भांडणाने रागवून अबोला धरलेली ती भावंडं असतात... पण भावा- बहीणीला कोणी बोललं तर बाजूने उभी राहणारीही तिच असतात...😎😍 कारण...भाऊ हा 'दादा' असतो...अन बहीण ही 'ताई' असते... चेहरा पाहून काही बिनसलं आहे हे चटकन ओळखणारी ती बहीण असते...😇 आपली गरज बाजूला ठेवून तीची आवड पूर्ण करणारा तो भाऊ असतो...😇 चुकलं जरी काही तर हक्काने ओरडणारा तो भाऊ असतो... अन चुका होऊ नये म्हणून काळ...

न भेटणारी मैत्री.....

Image
PC : Google काही नाती अशी असतात कि जी आयुष्यभर टिकतात.. त्यातही मैत्रीचं नातं म्हणजे स्पष्ट करता येणार नाही असं असतं .. त्यात हक्क, रुसवेफुगवे , भांडणे तर असतातच पण आपुलकी, जिव्हाळा, माणुसकीही असतेच..हे असं नातं आहे ज्यामुळे माणूस विश्वास म्हणजे काय हे शिकतो... मैत्री ही ठरवून कधीच होत नाही.. सर्वांनाच माहीत आहे... प्रत्येका साठी ती वेगळी असते 'आपली ' असते, 'हक्काची' असते. लहानपणी भांडण झालं तरी काही क्षणात सर्व विसरून पुन्हा त्याच्याशीच खेळायचा हट्ट असणारी ' मैत्री '; शाळेत पहिल्यांदाच बाकावरच्या अनोळखी चेहऱ्याशी झालेली घट्ट ' मैत्री'; महाविद्यालयात शिकताना जुन्या मित्रांना नकळत काहीसं लांब ठेवून नव्याने केलेली पण तेव्हाच ह्या नवीन मित्रांना जुन्या मैत्री चे किस्से सांगताना नकळत डोळ्यांत पाणी आणणारी 'मैत्री'; आयुष्यात पुढे जाताना कधी कधी मागे राहून गेलेली मैत्री, बऱ्याच वर्षांनी अचानक समोर आलेली पण तरी मैत्रीतला गोडवा अजूनही तसाच आहे हे समजल्यावर कंठ दाटून आणणारी मैत्री .............. हे आणि बरच काही.... काय मग आलं ना डोळ्यांसमो...

तो येतोय.....

Image
तो आला आहे... तो येतोय... मजल दरमजल करत हळूहळू का होइना तो येतोय... चिमुकल्यांचं लाडकं गाणं ऐकून.. अन थोरांचं आमच्यावेळी अगदी वेळेवर यायचा हे ऐकण्याआधी तो येतोय.... मातीचा धुरळा... पानांची सळसळ... हवेतला गारवा ... अन ओल्या मातीचा मनाला चिंब करणारा दरवळ घेऊन तो येतोय.... त्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो येतोय... लोकल वारीत अडकलेल्या चाकरमान्याला,  उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या देहाला क्षणभर विश्रांती द्यायला तो येतोय.... नवचैतन्याची उर्जा द्यायला तो येतोय... नद्या - तलावांची तहान भागवायला (महत्त्व सांगायला) तो येतोय... माणूस कसाही वागला तरी खरी 'माणूसकी' जपायला तो येतोय... पुर्वापार सृष्टीशी धरून ठेवलेली मैत्रीची वीण आणिक घट्ट करायला तो येतोय... चिंब पावसात भिजून भटकंती केल्यावर; गरमागरम चहाचा आस्वाद घेण्याचा आनंद द्यायला तो येतोय.. पंढरीच्या वाटेवर विठूनामाच्या गजरात तल्लीन वारकऱ्यांच्या; टाळ- मृदुंगाच्या नादात स्वतःचा अनादी सुर मिसळवायला तो येतोय... दहीहंडीची वाट पाहणाऱ्या गोविंदांना स्फूर्ती द्यायला तो येतोय... चैत्रचाहूल घेऊन ...

न काढलेले फोटो...अन आठवणींचा अल्बम

Image
         शीर्षक वाचून जरा संभ्रम वाटत असेल ना... फोटो जर काढलेच नसतील तर त्याविषयी काय बोलायचे? मुळात त्यांचे अस्तित्वच नाही... तर हे काय म्हणतेय ही अन असं बरचं काही....आठवणी कोणाला आवडत नाही? आणि त्या आठवणींशी जोडलेले प्रसंग आपल्याला पुन्हां काही काळ का होईना त्यात रमायला भाग पाडतात...आणि छायाचित्रांमध्ये साठवलेल्या आठवणी तर... आहाहा.... प्रत्येकाचा आवडीचा विषय...खरंतर फोटो/छायाचित्र ही संकल्पनाच किती छान आणि मोलाची आहे नाही... हल्ली उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे फोटो काढणं अन छायाचित्रण (फोटोग्राफी) किती सोप्पं झालयं.. सर्वच जण आपापल्या पध्दतीने, ज्ञानाने छायाचित्रण करत असतात... अगदी प्रत्येक क्षण फोटोंमध्ये बंदिस्त करून आठवणी तयार करत असतो आपण.. जरा काही वेगळं, घडत असेल, काही आनंदाचे क्षण लगेचच कैद करून..दुसऱ्याच क्षणी सर्वांपर्यंत पोहोचवला जातो...हेच बघा ना काल वाढदिवशी बहिणींनी दिलेल्या भेटवस्तू पाहून सहाजिकच आनंद तर झालाच पण थोड्याच वेळात हा आनंद सर्वांपर्यंत पोहोचलाही (WhatsApp ची कृपा)... अन वाटलं कसं ना अगदी सहजच आपण आपल्या ह्या आठवणी कॅम...

मनातल्या गुजगोष्टी : भाग - २ ....................

Image
     काही मनातलं... मनापासून...... माझ्या गुरुंकडून मिळालेला उपदेश - आशीर्वाद - आठवण      साच्यांमध्ये जखडवू नका,      काही नाती रक्ताची नसतात,      फुलदाणीत अडकवू नका,      काही फुलं प्राजक्ताची असतात....          - अनघा मांडवकर.            _________________________________ छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन        प्रथमपूज्य ॐकारा... हे मंगलमूर्ती...        कृपादृष्टी दिसे ह्या विश्वरुपी लोचनीं...              _______________________________ छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन        'दवबिंदू....'        इतुकेसे आयुष्य माझे रूपही असे छोटे जरी....        साज हा क्षणभंगुरतेचा दु:खातही सुख परि...              _________________________________ छायाचि...

ती नव्हतीच....

Image
तयारी झाली; बॅग घेतली... निघालो, एक एक जण भेटत गेला, ही पण भेटली, हा पण भेटला.. बहिणाबाईसाठी 'surprise' पण होतं.. पण ती नव्हती ......... हाय पण होतं, हॅलो पण होतं, काय कसं काय पण होतं, वाढदिवस साजरा करायला दोन- दोन केक पण होते...  भेट म्हणून मिळालेलं 'surprise' अन  'बाकरवडी(चितळ्यांची???)' पण होती... खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रांसोबत सेल्फी पण होता; सोबत न आलेल्या मित्रांची आठवण पण होती.... पण ती नव्हती..... गाड्या तयारीतच होत्या... सामान चढवलं... सगळे बसले... गणपती बाप्पा मोरया म्हणत... प्रवास सुरू झाला... गार वारा होता... डोळ्यांवर झोपही होतीच... सोबत गडावर जाण्याची उत्सुकता तर होतीच.. रात्री उशीरा 'बेलपाडा' गावात पोहोचलो... दोन तास होते फक्त झोपण्यासाठी... पण झोप लागत नव्हती...  तिच्या आठवणीने..... पण ती नव्हती.....   पहाटे गरमागरम चहा आणि पोह्यांसोबत शेकोटीही होती... ताजेतवाने होऊन चढाईसाठी तयारच होतो , ओळख परेड झाली, गडाविषयी माहितीही मिळाली,...