तो येतोय.....
तो आला आहे... तो येतोय...
मजल दरमजल करत हळूहळू का होइना तो येतोय...
चिमुकल्यांचं लाडकं गाणं ऐकून..
अन थोरांचं आमच्यावेळी अगदी वेळेवर यायचा हे ऐकण्याआधी
तो येतोय....
मातीचा धुरळा... पानांची सळसळ...
हवेतला गारवा ...
अन ओल्या मातीचा मनाला चिंब करणारा दरवळ घेऊन
तो येतोय....
त्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो येतोय...
लोकल वारीत अडकलेल्या चाकरमान्याला,
उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या देहाला क्षणभर विश्रांती
द्यायला तो येतोय....
नवचैतन्याची उर्जा द्यायला तो येतोय...
नद्या - तलावांची तहान भागवायला (महत्त्व सांगायला) तो येतोय...
माणूस कसाही वागला तरी खरी 'माणूसकी' जपायला तो येतोय...
पुर्वापार सृष्टीशी धरून ठेवलेली मैत्रीची वीण आणिक घट्ट करायला तो येतोय...
चिंब पावसात भिजून भटकंती केल्यावर;
गरमागरम चहाचा आस्वाद घेण्याचा आनंद द्यायला तो येतोय..
पंढरीच्या वाटेवर विठूनामाच्या गजरात तल्लीन वारकऱ्यांच्या;
टाळ- मृदुंगाच्या नादात स्वतःचा अनादी सुर मिसळवायला तो येतोय...
दहीहंडीची वाट पाहणाऱ्या गोविंदांना स्फूर्ती द्यायला तो येतोय...
चैत्रचाहूल घेऊन येताना...
येणाऱ्या वैशाखवणव्यात सोबत करायला तो येतोय...
मोहक श्रावणसरीं सोबत...
मंगलमय वरदहस्ताच्या आगमनाची वर्दी द्यायला
तो येतोय....
दोस्तांच्या गप्पागोष्टींची रंगत वाढवायला तो येतोय...
लहानपणीच्या कागदी होड्यांची आवर्जून आठवण करून द्यायला तो येतोय...
चिखल - पाण्यात खेळण्याची मजा द्यायला तो येतोय...
छत्री असतानाही उनाड भिजत येण्याचा आनंद द्यायला तो येतोय...
अन चिंब भिजुन आल्यावर ...
गरमागरम चहा आणि भजीचा बेत आखण्यासाठी तो येतोय..
हो तो येतोय लवकरच पूर्णपणे येतोय...
अन सोबत अशाच 'बरसणाऱ्या आठवणी' घेऊन...
तो येतोय....
- नंदिनी हाटकर.
----------------------------------------------------------------------------
'कला' हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏
अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.
कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


तो येतोय.. तो आला.. मस्तच.. छान लिहिलेस..
ReplyDeleteThank you
Deleteवाह छान मस्तच 👌👌👍बरसत रहा लिहित रहा🖋
ReplyDeleteThank you
DeleteKya khub!!!
ReplyDelete☺
👍
Thank u 😊
Deleteछानच एकदम...
ReplyDeleteThank u 😊
Delete