भाऊ- बहीण अन राखी
PC: Google राखी नसतो फक्त धागा नात्यांची वीण घट्ट करणारा... असतो एक बंध नात्यांना बांधणारा.... जवळ असो वा दूर; ही राखीच त्यांना जोडत असते... कारण 'दादा' अन 'ताई'च्या नात्यात भावनांची भेळ असते.... भातुकलीच्या चुलीवरचा चहा अन तव्यावरची गरमागरम पोळी म्हणजे बहीण असते...तर ईवल्याश्या बॅट ने फुटभर अंतरावर मारलेल्या 'सिक्सर' ची फुशारकी म्हणजे भाऊ असतो....😛 बालपणी मस्ती करत येताना धडपडून लागलेली जखम आई पासून लपवणारी ती बहीण असते...😎 तर लाईट गेल्यावर अंधाराची भीती घालवण्यासाठी; मेणबत्तीच्या प्रकाशात बसून भूताच्या गोष्टी सांगणारा तो भाऊ असतो...😂😁 लुटूपुटूच्या भांडणाने रागवून अबोला धरलेली ती भावंडं असतात... पण भावा- बहीणीला कोणी बोललं तर बाजूने उभी राहणारीही तिच असतात...😎😍 कारण...भाऊ हा 'दादा' असतो...अन बहीण ही 'ताई' असते... चेहरा पाहून काही बिनसलं आहे हे चटकन ओळखणारी ती बहीण असते...😇 आपली गरज बाजूला ठेवून तीची आवड पूर्ण करणारा तो भाऊ असतो...😇 चुकलं जरी काही तर हक्काने ओरडणारा तो भाऊ असतो... अन चुका होऊ नये म्हणून काळ...