Posts

Showing posts from 2017

मनातल्या गुजगोष्टी....................

Image
PC & Copyright : Durgesh Mahajan  ' प्रतिबिंब '... माझेच प्रतिबिंब तू , माझीच सावली.... स्पर्शुन तुलाही न स्पर्शीलेली..... समोरच आहेस माझ्यातलीच मी... तरीही का परक्याप्रमाणे भासली... - नंदिनी हाटकर.           ____________________________________ मंजिले मिल ही जाती हे जिंदगीमे;       हर मुश्किल रास्तोंसे गुजरने के बाद..... पर सामने मुश्किल रास्तां भी ना हो;      तो आखिर कैसे पहुंचे उन मंजिलों के पास...... - नंदिनी हाटकर.            ____________________________________ सुहाने मौसम मे अचानक;         घने बादल छाने लगे.... दिल बोला.....      बादल जैसे आए; वैसे चले भी जायेंगे क्यों ना थोडा मुस्कुरालु............ - नंदिनी हाटकर. - क्रमशः..... मनातल्या गुजगोष्टी : भाग - २ ---------------------------------------------------------------------------- 'कला' हे  एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला  मद...

निरुत्तर....

Image
काय बोलू शब्दच नव्हते... तेव्हा मनात आणि डोळ्यांत अश्रूंशिवाय उत्तर नव्हते... वाटलं नव्हतं दिवाळी अशीही साजरी होईल... पाऊल टाकताच उठून बसले..  थकलेले पण तेवढेच आतूर डोळे... शुभ दीपावली म्हणून थरथरत्या हातांनी मिळालेला आशीर्वाद; खूप काही सांगत होता..  चेहऱ्यावरचा आनंद जणू रक्ताचं नातं शोधत होता....  काय बोलू शब्दच नव्हते... तेव्हा मनात आणि डोळ्यांत अश्रूंशिवाय उत्तर नव्हते... काय माहीत दिवाळी ते किती वर्षांनी साजरी करत होते.. केक कापताना ऐकू आला एक भाबडा आवाज... आजोबांनी प्रश्न केला...'मला पण केक मिळणार ना ?'................................. काय बोलू शब्दच नव्हते... तेव्हा मनात आणि डोळ्यांत अश्रूंशिवाय उत्तर नव्हते... गप्पागोष्टी झाल्या...मनातील अश्रू शब्दांमार्फत वाहत होते.... त्यांचे डोळे मुलं आणि नातवंडे यांच्यासाठी आसुसले होते.... काळजी घ्या, परत नक्की या...  अनामिक नात्याच्या हक्काने ते पुन्हां पुन्हां सांगत होते..... 'उभी का तू , बस ना इथे' आजोबा म्हणाले.... सहज म्हणाले मी, आजोबा तुम्ही खरचं आरामात बसा..काहीच...

रत्नांसोबतचा.... रतनगड

Image
          नमस्कार.. खूप दिवसांनी लिहिते आहे, खरतर तसं खूप आधी पासूनच लिहित होते... पण बरचं काही अर्ध्यावर राहून गेलय...असो आता पुन्हा प्रयत्न... उशीर नाही म्हणणार कारण उशीर कधीच नसतोच; नव्याने सुरुवात असते... तर ह्या नव्या प्रयत्नाचं कारणही तसचं आहे...                      दररोजच्या धावपळीच्या जगण्यातून काही काळ बाहेर पडून मोकळा श्वास घेणं कोणाला नाही आवडत... प्रकृतीचं अफाट सौंदर्य, इतक्या वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या गड - किल्यांवर भटकंती करताना काही काळ का होईना निसर्गाच्या सानिध्यात रहायला मिळणं हि खरेतर आजच्या प्रदूषणयुक्त जीवनातली गरज वाटते (तसं मी 'निसर्गा'च्या सानिध्यात नेहमीच असते....😀)                   म्हणूनच जमेल त्या त्या वेळी अशा भटकंती साठी माझ्या बहिणींसोबत निघते... आत्तापर्यंत अशी भटकंती केलेल्या सर्व गडांमध्ये सुंदर असं रत्नच आहे रतनगड... भंडारदरा परिसरात असलेला आणि प्रवरा नदीचं उगमस्थान असलेला रतनगड सर्व भटक्यांना प्रेरणा देणारा आहे....

तो नव्हताच..............

Image
तयारी झाली; बॅग घेतली... निघालो, एक एक जण भेटत गेला, ही पण भेटली, हा पण भेटला, पण तो नव्हता.......... 'हाय' पण होतं, 'हॅलो' पण होतं, 'काय कसं काय' पण होतं, पहाटे 'दोनदा' रांगेत उभं राहून कढलेली तिकिटं पण होती, गाडी आत्ता येईल....पण.. कोणी उशिरा येतयं ह्यासाठी 'फोनाफोनी' पण होती; खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रा सोबत सेल्फी पण होता; सोबत न आलेल्या मित्रांची आठवण पण होती.... पण तो नव्हता...... गाडीत बसायला जागा होती, कोणाला नव्हती,  पोहे पण होते, कचोरीही  होती... ब्रेड- जाम आणि कॅडबरी पण होती; गप्पा होत्या, गाणी होती, मजा होती, मस्करीही होती, एवढच काय कोणीच न दिलेला 'टक्का' पण होता, पण तो अजूनही नव्हता........... ट्रेन फलाटाला पण लागली, दुसऱ्या फलाटावरुन पुढचा प्रवास सुरू झाला, पुढे  जायला टमटम पण होती, मागची मंडळी येईपर्यंत पाहिलेला निसर्गही होता; वेगवेगळे फोटो आणि खूप सारे सेल्फी तर होतेच, मागे राहिलेली मंडळीही आली, पण फक्त तो नव्हता.............. गावात पायथ्याशी पोहोचलो... पोहे होते, तरतरी...