Posts

अन पुन्हा माणूसकी भेटली.

Image
                                 लहानपणापासून शिकत आलो माणूसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे.. प्रत्येकाने दुसऱ्याशी चांगलेच वागावे.. फार नाही तर निदान आपल्याला जमेल तेवढी मदत गरजूला करावी. कोणाला फसवू नये. तरी कधीकधी लोकांचा मानवतेवरचा विश्वास काहीप्रमाणात कमी होताना दिसत असला तरी संपलेला नाही. काळ बदलत गेला तसा मानवाचे रंग बदलत गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी मानवाला नाती, माणूसकी ह्या सर्व गोष्टी नगण्य वाटू लागल्या. काही प्रमाणात स्वार्थ हा सर्वात मोठा ठरताना दिसतो. आजचा काळ तर ह्या सर्वाची प्रचिती देणारा असला तरी माणुसकी पूर्णतः नष्ट झाली असं म्हणता येणार नाही. आजच घडलेला अनुभव...         ११ ची वेळ.. (अर्थात सद्यस्थितीत रेल्वेच्या नियमावलीनुसार)  सकाळी कामावर जाताना मुंबईकर जसा नेहमी घाईतच असतो; तशी मीही काहीशी घाईतच होते.. ट्रेन मध्ये चढतानाचा अलिखित नियम मुंबईकरांना सवयीचाच आहे. तो म्हणजे स्वतःला आणि सोबतच्या सामानाला नीट सांभाळायचं. आपली बॅग पुढे पकडूनच ट्रेनमध्ये चढायच...

नवी सुरुवात

Image
     PC : www.pixabay.com           " तो, ती आणि लॉकडाऊन "    ह्या काल्पनिक कथेला तुम्हा सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला.. अन सोबत पुढच्या भागाची मागणीही केली. हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं म्हणा ना... तरी वाचकांच्या आग्रहाखातर त्या कथेचा पुढील भाग लिहिण्याचा प्रयत्न केला आहे... विशेष सूचना - सद्यस्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. हे सर्व पूर्णपणे पूर्ववत सुरळीत कधी चालू होईल हे सध्या कोणीच सांगू शकत नाही.. तरी प्रत्येकाला हे सगळं लवकरात लवकर पूर्ववत व्हावं अशीच इच्छा आहे हे लक्षात घेऊनच कथेतला काळ कल्पिला आहे.... _______________________________________________________          त्यादिवशी सलग ३-४ केक ची मागणी असल्याने ते पोहोचवण्यातच ती व्यस्त होती. त्यामुळे भ्रमणध्वनी (फोनवर) आलेले सगळ्यांचे संदेश तिने विशेष पाहिले नव्हते..दुसऱ्या दिवशी जास्ती काम नसल्याने ती  थोडं उशिराच उठली. सगळं आवरून झाल्यावर ती खोलीत तिच्या आवडत्या झुल्यावर जाऊन बसली. हातातला चहाचा कप तिने खिडकी जवळ ठ...

तो, ती आणि लॉकडाऊन

Image
PC : Freepik        वेळ सकाळची.. आज जरा उशीर झाला म्हणत ती धावतच बस थांब्यावर पोहोचली. बघता बघता बस सुटली देखील... अजून पंधरा मिनिटं पुढच्या बसची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.. सकाळच्या वेळीही कडक ऊन होते.. नंतर घाई नको म्हणून सुट्टे पैसे काढून ठेवले आणि सोबत निघताना घाईतही न विसरता पर्समध्ये ठेवलेला स्कार्फ काढून पूर्ण चेहऱ्यावर गुंडाळला... (प्रदूषणापासून आणि उन्हापासून चेहऱ्याचे आणि केसांचे रक्षण व्हावे म्हणून ती रोजच घरातून निघताना स्कार्फ बांधूनच निघायची.. घाईत असली तर न चुकता तो स्कार्फ घ्यायला विसरायची नाही तिच्या आवडीचा स्कार्फ होता तो; अगदी रोजच नाही पण बऱ्याचदा ती हाच स्कार्फ वापरायची.)       बस येते का बघायचं आणि मध्ये मध्ये फोन मध्ये कोणाचा महत्वाचा संदेश आला आहे का तपासत असताना तिला बाजूने हसत गप्पांचा आवाज आला म्हणून सहज त्या दिशेने पाहिलं तर  ५-६ मुलामुलींचा गट त्यांच्यातल्याच एकाची गम्मत करत होते.. ते बघून तिलाही तिचे मित्रमंडळी आठवले असावे.. ती मनातच हसून पुन्हां बस येण्याच्या दिशेने बघू लागली...

बस...भीती...अन आईचं नेटवर्क...

Image
नमस्कार, बऱ्याच दिवसांनी काही लिहायचा हा छोटासा प्रयत्न... निमित्त होतं ते 'भटकंती महाराष्ट्राची' ने मातृदिन विशेष आयोजित केलेल्या स्पर्धेचं.... स्पर्धा अशी की ' आपल्या आईसोबतची भटकंती/प्रवासाविषयी असलेली आठवण लेखनस्वरूपात पाठवायची' होती... अन आदल्या दिवशी रात्री हे लिखाण केले.. खरंतर झोपेत असल्याने काही चूका असल्यास क्षमस्व.... स्पर्धेसाठी आईसोबतची आठवण हा महत्वाचा मुद्दा असल्याने हा ५ दिवसांचा अनुभव थोडक्यात मांडला आहे... पूर्ण अनुभव मागे लिहिता लिहिता अर्धवट राहून गेला होता पण स्पर्धेनिमित्त का होईना थोडक्यात लिहिता आलं त्यासाठी अन मला ह्या स्पर्धेत  सहविजेती ठरवलं त्यासाठी 'भटकंती महाराष्ट्राची' टीमचे खूप खूप आभार... तर नक्की वाचा... आपल्या सूचना अन प्रतिक्रिया सर्व स्विकारल्या जातील... धन्यवाद.🙏🙏 बस...भीती...अन आईचं नेटवर्क... भटकंती... फिरणं... हे काय असतं... हे जेव्हा आपल्याला समजतही नसतं तेव्हापासूनच खरंतर आपल्या फिरण्याची सुरुवात झालेली असतेच...आणि तीही आपल्या आईमुळेच... हो खरं आहे.. विचार करून बघा..तान्हुल्या जीवाचं पोषण-रक्षण करताना ...

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...

Image
छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन सरतय वर्ष... काही तरी राहून जातय ... सरतय वर्ष... काही तरी राहून जातय ... कधीतरी... कुठेतरी....तुम्हांलाही असचं वाटतयं? बघा आठवून पहा...आपण कोणाची... की कोणी आपली आठवण काढतय.... सरतयं वर्ष... काही तरी राहून जातय... कधीतरी... कुठेतरी....तुम्हांलाही असचं वाटतयं? सर्वच बरोबर आहे की, चुकतयं काही... सरतयं वर्ष... की खरचं राहून जातयं काही.... कधीतरी... कुठेतरी....तुम्हांलाही असचं वाटतय? चित्र उतरले शब्दांत अनेकदा... तरी लेखणी ही आहेच रिती... आशीर्वाद तुमचा असाच राहो.. नव वर्षीही भरेल ही शिदोरी... सरतयं वर्ष... काही तरी राहून जातय... कधीतरी... कुठेतरी....तुम्हांलाही असचं वाटतय? आभार तर नेहमीच मानते... आज मागते माफीही... समजून घेतलं आत्तापर्यंत... पुढेही साथ द्याल का अशीही... सरतयं वर्ष... काही तरी राहून जातय... कधीतरी... कुठेतरी....तुम्हांलाही असचं वाटतय? नूतन वर्षाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा...  अशीच साथ ह्या वर्षातही राहूदेत... खूप खूप धन्यवाद... - ...

भाऊ- बहीण अन राखी

Image
PC: Google राखी नसतो फक्त धागा नात्यांची वीण घट्ट करणारा... असतो एक बंध नात्यांना बांधणारा.... जवळ असो वा दूर; ही राखीच त्यांना जोडत असते... कारण 'दादा' अन 'ताई'च्या नात्यात भावनांची भेळ असते.... भातुकलीच्या चुलीवरचा चहा अन तव्यावरची गरमागरम  पोळी म्हणजे बहीण असते...तर ईवल्याश्या बॅट ने फुटभर अंतरावर मारलेल्या 'सिक्सर' ची  फुशारकी म्हणजे भाऊ असतो....😛 बालपणी मस्ती करत येताना धडपडून लागलेली जखम आई पासून लपवणारी ती बहीण असते...😎 तर लाईट गेल्यावर अंधाराची भीती घालवण्यासाठी; मेणबत्तीच्या प्रकाशात बसून भूताच्या गोष्टी सांगणारा तो भाऊ असतो...😂😁 लुटूपुटूच्या भांडणाने रागवून अबोला धरलेली ती भावंडं असतात... पण भावा- बहीणीला कोणी बोललं तर बाजूने उभी राहणारीही तिच असतात...😎😍 कारण...भाऊ हा 'दादा' असतो...अन बहीण ही 'ताई' असते... चेहरा पाहून काही बिनसलं आहे हे चटकन ओळखणारी ती बहीण असते...😇 आपली गरज बाजूला ठेवून तीची आवड पूर्ण करणारा तो भाऊ असतो...😇 चुकलं जरी काही तर हक्काने ओरडणारा तो भाऊ असतो... अन चुका होऊ नये म्हणून काळ...

न भेटणारी मैत्री.....

Image
PC : Google काही नाती अशी असतात कि जी आयुष्यभर टिकतात.. त्यातही मैत्रीचं नातं म्हणजे स्पष्ट करता येणार नाही असं असतं .. त्यात हक्क, रुसवेफुगवे , भांडणे तर असतातच पण आपुलकी, जिव्हाळा, माणुसकीही असतेच..हे असं नातं आहे ज्यामुळे माणूस विश्वास म्हणजे काय हे शिकतो... मैत्री ही ठरवून कधीच होत नाही.. सर्वांनाच माहीत आहे... प्रत्येका साठी ती वेगळी असते 'आपली ' असते, 'हक्काची' असते. लहानपणी भांडण झालं तरी काही क्षणात सर्व विसरून पुन्हा त्याच्याशीच खेळायचा हट्ट असणारी ' मैत्री '; शाळेत पहिल्यांदाच बाकावरच्या अनोळखी चेहऱ्याशी झालेली घट्ट ' मैत्री'; महाविद्यालयात शिकताना जुन्या मित्रांना नकळत काहीसं लांब ठेवून नव्याने केलेली पण तेव्हाच ह्या नवीन मित्रांना जुन्या मैत्री चे किस्से सांगताना नकळत डोळ्यांत पाणी आणणारी 'मैत्री'; आयुष्यात पुढे जाताना कधी कधी मागे राहून गेलेली मैत्री, बऱ्याच वर्षांनी अचानक समोर आलेली पण तरी मैत्रीतला गोडवा अजूनही तसाच आहे हे समजल्यावर कंठ दाटून आणणारी मैत्री .............. हे आणि बरच काही.... काय मग आलं ना डोळ्यांसमो...