नवी सुरुवात

    
PC : www.pixabay.com


         " तो, ती आणि लॉकडाऊन "    ह्या काल्पनिक कथेला तुम्हा सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला.. अन सोबत पुढच्या भागाची मागणीही केली. हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं म्हणा ना... तरी वाचकांच्या आग्रहाखातर त्या कथेचा पुढील भाग लिहिण्याचा प्रयत्न केला आहे...
विशेष सूचना - सद्यस्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. हे सर्व पूर्णपणे पूर्ववत सुरळीत कधी चालू होईल हे सध्या कोणीच सांगू शकत नाही.. तरी प्रत्येकाला हे सगळं लवकरात लवकर पूर्ववत व्हावं अशीच इच्छा आहे हे लक्षात घेऊनच कथेतला काळ कल्पिला आहे....
_______________________________________________________
  
      त्यादिवशी सलग ३-४ केक ची मागणी असल्याने ते पोहोचवण्यातच ती व्यस्त होती. त्यामुळे भ्रमणध्वनी (फोनवर) आलेले सगळ्यांचे संदेश तिने विशेष पाहिले नव्हते..दुसऱ्या दिवशी जास्ती काम नसल्याने ती  थोडं उशिराच उठली. सगळं आवरून झाल्यावर ती खोलीत तिच्या आवडत्या झुल्यावर जाऊन बसली. हातातला चहाचा कप तिने खिडकी जवळ ठेवला आणि फोन हातात घेतला; चला आता निवांत सगळ्यांचे संदेश पाहू म्हणत एक एक संदेश पाहू लागली.. 
          
          त्याचा संदेश आला होताच - केक घरी सगळ्यांना आवडला... खरंच खूपच छान होता👍👌 पुढच्यावेळीही तुमच्याकडूनच घेणार. 

         ते वाचून ती खुश झाली...😊 कालची अनपेक्षित भेट तिला आठवली... काय करावं? विचारावं का? त्याने ओळखलं का काल हे जाणून घेण्याची उत्सुकता तिलाही होतीच... नको राहू देत... अशी काही आपली नीट ओळखही नाही. चांगलं नाही वाटणार...समोरून काही विचारलं तर बघू असा विचार करून तिने फक्त "धन्यवाद😊🙏" एवढाच संदेश पाठवला... अन चहा पित त्याचाच विचार करत बसली...
            
          तिचा संदेश आला म्हणून त्यालाही आनंद झाला पण फक्त एवढंच? तिने विचारलं कसं नाही काल मी ओळखलं की नाही ते; असा विचार तो करू लागला... तिचं असं अचानक भेटणं त्यालाही सुखावून गेलं होतं. मी तिला ओळखलं आहे हे तिला कसं सांगावं? काय करावं? त्यालाही कळत नव्हतेच... तिला नाही आवडलं तर? संपर्क होतोय म्हटल्यावर मागे लागलाय वगैरे विचार केला तर ? पण नाही; ती असा विचार का करेल तिनेच तर बोलण्यातून तिच्या ओळखीचा इशारा दिला होता.... 
               
         तसं पहायला गेलं तर दोघांची ओळख ही अनोळखीच होती आणि म्हणूनच दोघेही संकोचत होते... आणि एकमेकांच्या संदेशाची वाट पाहत होते... असेच काही दिवस आणखी गेले पण दोघांचं संकोचणं काही कमी नाही झालं... ते फक्त वाटंच पाहत राहिले... 

         दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले तसे ह्या वाट पाहण्याकडेही दुर्लक्षच होत गेलं....काही महिने गेले..... 
       तिच्या केकसाठी बऱ्याच मागण्या येऊ लागल्यामुळे ती खुषही होती आणि व्यस्तही राहू लागली...
        तिथे कार्यालयही इतक्या महिन्यांनी पुन्हां सुरू झाल्यामुळे त्याचाही धावपळीचा नित्यक्रम सुरु झाला... 

         लॉकडाऊन पूर्ण संपून सगळं सुरळीत सुरु झालं आणि सोबत नावीन्याचे वारे वाहू लागले.. अहो, नवीन वर्ष सुरु झालं.. सर्वत्र एक नवीन उत्साह, नवीन उमेद, नवीन स्वप्नं, नवीन संकल्प ह्यांना उधाण आलं तरी आवश्यक ती सर्व काळजी घेतच सर्वांनीच आपापल्या परिने नवीन वर्षाचं स्वागत केलं...

       ३१ डिसेंबर हा दिवस  ह्यावर्षी तिच्यासाठी खूप वेगळा गेला.. नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणूनही बऱ्याच जणांनी तिच्याकडून केक मागवले... त्यादिवशी खूप दगदग झाली असली तरी; ती तेवढीच आनंदीही होती... हे वर्ष खरोखरच नावीन्यपूर्ण असणार... माझा हा छोटासा व्यवसाय हळूहळू मोठ्या स्तरावर न्यायला हवा आता; असा ती विचार करत होती... विश्वास दाखवून तिच्याकडून केक मागवलेल्या प्रत्येक ग्राहकाला तिने आवर्जून 'पुन्हां एकदा सर्वांचे खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा' असा संदेश पाठवला... आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं ठरवून झोपली...
 
          इथे तोही सर्वांना शुभेच्छा पाठवित असतानाच त्याला तिचा संदेश मिळाला.... हे अनपेक्षित असल्यामुळे तो खूप खूष झाला... अन त्यानेही शुभेच्छा संदेश तिला पाठवला... अन तीच्या आठवणीत एवढा रमून गेला की त्याला बराच वेळ झोप लागली नाही....

          नववर्षाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे लवकर उठून गणपती मंदिरात दर्शनासाठी गेली... (लॉकडाउन नंतर मंदिरात जायला मिळण्याची परवानगी मिळाल्यामुळेही ती आणखी आनंदी होती)
 
          दर्शन झाल्यावर बाहेर येऊन चप्पल घालत असतानाच बाजूला लक्ष गेले.. अन ती पाहतच बसली.. तिचा पुन्हां डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता... तोच तिच्या बाजूला चप्पल घालत उभा होता.. ती मनोमन खूप आनंदली.....😌😊😇

          तुम्ही इथे? कसे आहात?  बऱ्याच दिवसांनी भेटलो, वाटलं नव्हतं; पुन्हा कधी भेट होईल.. आनंदाच्या भरात ती नकळतपणे पटापट बोलू लागली...
     
        तो काहीशा प्रश्नार्थक नजरेने तिच्या कडे पाहत ओळखीतली कोणी आहे का आठवू लागला. त्याला काही लक्षात येत नव्हतं..
तुम्ही ओळखता का मला ? त्याने विचारले..

         ओळखलं नाहीत? ती म्हणाली. पण त्याने कधी आपला चेहराच पाहिला नसल्याचे लगेचच तिच्या लक्षात आले...
         जरा थांबा बोलत तिने पर्स मधून तिच्या आवडीचा स्कार्फ काढून चेहऱ्यावर बांधला.... आणि तसंच स्मितहास्य करत म्हणाली; आता ओळखलं का????

         😌😊😇क्षणार्धात तो खूपच आनंदला.... आता त्याचाही जे घडत आहे त्यावर विश्वास बसत नव्हता..."अच्छा, तुम्ही होय?? तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं ना; म्हणून कळलंच नाही"- तो म्हणाला. रात्री अचानक आलेला तिचा संदेश आणि आत्ता तिचं भेटणं हे खूपच अनपेक्षित होतं.  तो एवढा खूष झाला की, काय बोलावं, काय करावं त्याला सुचतच नव्हते......

           तुम्ही एवढ्या सकाळी मंदिरात येता तिने आश्चर्यानेच विचारले...
नाही एवढ्या सकाळी आजच आलो.. दरवर्षी नववर्षाला सकाळी लवकर ह्या गणपतीचं दर्शन घेऊन पुढील वर्ष दाखवल्याबद्दल आभार मानायचे आणि आलेलं वर्ष सुखासमाधानाचे जावो ह्या साठी प्रार्थना करणं हा आईचा शिरस्ता... आईची तब्येत थोडी ठीक नाही, अन हा शिरस्ता चुकायला नको म्हणून तिने मला मंदिरात पाठविले असल्याचे त्याने सांगितले.....

        पण मग तुम्ही येता रोज मंदिरात? त्यानेही उत्सुकतेने विचारले..
  
      मी नवीन वर्षाची सुरुवात ह्या मंदिरात येऊनच करते... अन तसंही मी रोजच सकाळी ह्या जवळच्या मैदानात फिरायला (मॉर्निंग वॉक) येतेच; ओघानेच तिने सांगितले....आताही एक- दोन फेऱ्या मारून निघेन.....
   तुम्ही आत्ता येता का सोबत फेरी मारायला? तिने सहज असं विचारताच; बाप्पाच्या दर्शनासाठी आज आलो नसतो तर ही भेट हुकली असती असा विचार करत मनोमन आईचे अन बाप्पाचे खूप आभार मानले...😃😊🙏
      हो येतो.. चला चालता चालता बोलू; तो म्हणाला.

तेवढ्यात त्याचा फोन वाजला....
त्याची रिंगटोन होती - 🎼🎶🎵 "भेटली... तूपुन्हा..."🎼🎶🎵

ते ऐकून दोघंही त्यांच्या आत्तापर्यंतच्या भेटी आठवून हसत राहिले; बराच वेळ ते फेऱ्या मारत आहेत हे त्यांच्या लक्षातही आलं नाही....

ही नवी सुरुवात दोघांसाठीही अनपेक्षित आणि सुखावह होती.😃😊😌
तेव्हाच त्याने रोज मॉर्निंग वॉक ला येण्याचा नववर्षाचा संकल्प केला........
अन त्या दिवसानंतर तो रोज लवकर उठू लागलाच अन पुढे आयुष्यभर ते एकत्रच मॉर्निंग वॉकला जाऊ लागले...... 

- समाप्त.

© नंदिनी हाटकर.


PC : www.pixabay.com

Comments

  1. खूपच मस्त😍 अशीच लिहीत रहा👍🤘

    ReplyDelete
    Replies
    1. 😌😇😊खूप खूप धन्यवाद❤️

      Delete
  2. Replies
    1. 😊खूप खूप धन्यवाद

      Delete
  3. ❤️❤️✍�� सही ❤️✍��असच लिहीत रहा

    ReplyDelete
    Replies
    1. 😌😇😊खूप खूप धन्यवाद❤️

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

न भेटणारी मैत्री.....

अन पुन्हा माणूसकी भेटली.

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...