तो नव्हताच..............
तयारी झाली; बॅग घेतली... निघालो, एक एक जण भेटत गेला, ही पण भेटली, हा पण भेटला, पण तो नव्हता.......... 'हाय' पण होतं, 'हॅलो' पण होतं, 'काय कसं काय' पण होतं, पहाटे 'दोनदा' रांगेत उभं राहून कढलेली तिकिटं पण होती, गाडी आत्ता येईल....पण.. कोणी उशिरा येतयं ह्यासाठी 'फोनाफोनी' पण होती; खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रा सोबत सेल्फी पण होता; सोबत न आलेल्या मित्रांची आठवण पण होती.... पण तो नव्हता...... गाडीत बसायला जागा होती, कोणाला नव्हती, पोहे पण होते, कचोरीही होती... ब्रेड- जाम आणि कॅडबरी पण होती; गप्पा होत्या, गाणी होती, मजा होती, मस्करीही होती, एवढच काय कोणीच न दिलेला 'टक्का' पण होता, पण तो अजूनही नव्हता........... ट्रेन फलाटाला पण लागली, दुसऱ्या फलाटावरुन पुढचा प्रवास सुरू झाला, पुढे जायला टमटम पण होती, मागची मंडळी येईपर्यंत पाहिलेला निसर्गही होता; वेगवेगळे फोटो आणि खूप सारे सेल्फी तर होतेच, मागे राहिलेली मंडळीही आली, पण फक्त तो नव्हता.............. गावात पायथ्याशी पोहोचलो... पोहे होते, तरतरी...