भाऊ- बहीण अन राखी
![]() |
| PC: Google |
राखी नसतो फक्त धागा नात्यांची वीण घट्ट करणारा...
असतो एक बंध नात्यांना बांधणारा....
जवळ असो वा दूर; ही राखीच त्यांना जोडत असते...
कारण 'दादा' अन 'ताई'च्या नात्यात भावनांची भेळ असते....
भातुकलीच्या चुलीवरचा चहा अन तव्यावरची गरमागरम पोळी म्हणजे बहीण असते...तर
ईवल्याश्या बॅट ने फुटभर अंतरावर मारलेल्या 'सिक्सर' ची फुशारकी म्हणजे भाऊ असतो....😛
बालपणी मस्ती करत येताना धडपडून लागलेली जखम आई पासून लपवणारी ती बहीण असते...😎
तर लाईट गेल्यावर अंधाराची भीती घालवण्यासाठी;
मेणबत्तीच्या प्रकाशात बसून भूताच्या गोष्टी सांगणारा तो भाऊ असतो...😂😁
लुटूपुटूच्या भांडणाने रागवून अबोला धरलेली ती भावंडं असतात...
पण भावा- बहीणीला कोणी बोललं तर बाजूने उभी राहणारीही तिच असतात...😎😍
कारण...भाऊ हा 'दादा' असतो...अन बहीण ही 'ताई' असते...
चेहरा पाहून काही बिनसलं आहे हे चटकन ओळखणारी ती बहीण असते...😇
आपली गरज बाजूला ठेवून तीची आवड पूर्ण करणारा तो भाऊ असतो...😇
चुकलं जरी काही तर हक्काने ओरडणारा तो भाऊ असतो...
अन चुका होऊ नये म्हणून काळजीने समजवणारी ती बहीण असते....😍😇
आपल्या आवडी लक्षात आहे का हे तपासण्यासाठी;
'ओवाळणी' मागण्याचा तर बहाणा असतो..😛
एकमेकांची कायम साथ देण्याच्या वचनाचा; तिने बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो...😇😍
त्याला माहीत असतं बरोबर काय आवडतं तिला...
तरी आधी नावडती गोष्ट पुढे करून तिला चिडवणारा तो भाऊ असतो...😁😀😛😜😝
त्याच्या यशाचं कौतुक करण्याआधी डोळ्यांतून वाहीलेली गंगा ती बहीण असते....😂
अन ज्याने मारलेल्या टपलीतही; कौतुकाची थाप म्हणजे तो भाऊ असतो...😎😇
कितीही काढल्या खोड्या त्याने; तरी लाडाने सर्व हट्ट पुरवणारी ती बहीण असते...😎😍
कटकट करणाऱ्या बहीणीची पाठवणी करताना कोपऱ्यात जाऊन हमसून रडणारा तो भाऊ असतो...😭😍😇😘
रागावले जरी तरी एकमेकांवाचून पान मात्र हालत नाही..
कारण...भाऊ हा 'दादा' असतो...अन बहीण ही 'ताई' असते...
ह्याच प्रेमाच्या नात्याने आयुष्य हे घडत असते.....कारण
भाऊ हा जीवनाचा 'फोटो' तर बहीण ही त्याची 'कॅप्शन' असते..😂😄😇😍😍
तर ह्या बहीणी कडून तुम्हां सर्व भावा बहीणींना ही शब्दरुपी राखीची ओवाळणी देण्याचा हा मोडका- तोडका छोटासा प्रयत्न.... कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या ओवाळणीतून नक्की द्या...(ओवाळणी म्हणून आणि काही दिलं तरी स्वीकारली जाईल😁😀😂😝😛😜)
सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा....😇😃😄
- ©नंदिनी हाटकर.
----------------------------------------------------------------------------
'कला' हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏
अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.
कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

खूपच सुंदर...����बहीण भावाच नातं अगदी सुंदर रीतीने कवितेतून सांगितलस.��
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद रुपाली 😇😃
Deleteखूप सुंदर
Deleteधन्यवाद आई☺
DeleteNandini Best lihilas ��perfect
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद वैभवी 😇😃
Deleteखूप छान!!! प्रत्येक भावाची आणि बहिणीची लाईन्स आहेत
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसुरेख
ReplyDeleteखूप धन्यवाद डॉ.अपर्णा...
Deleteछान व्यक्त केलंय भावाबहिणीचं नातं.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ज्योती ताई..
Delete