न काढलेले फोटो...अन आठवणींचा अल्बम
शीर्षक वाचून जरा संभ्रम वाटत असेल ना... फोटो जर काढलेच नसतील तर त्याविषयी काय बोलायचे? मुळात त्यांचे अस्तित्वच नाही... तर हे काय म्हणतेय ही अन असं बरचं काही....आठवणी कोणाला आवडत नाही? आणि त्या आठवणींशी जोडलेले प्रसंग आपल्याला पुन्हां काही काळ का होईना त्यात रमायला भाग पाडतात...आणि छायाचित्रांमध्ये साठवलेल्या आठवणी तर... आहाहा.... प्रत्येकाचा आवडीचा विषय...खरंतर फोटो/छायाचित्र ही संकल्पनाच किती छान आणि मोलाची आहे नाही... हल्ली उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे फोटो काढणं अन छायाचित्रण (फोटोग्राफी) किती सोप्पं झालयं.. सर्वच जण आपापल्या पध्दतीने, ज्ञानाने छायाचित्रण करत असतात... अगदी प्रत्येक क्षण फोटोंमध्ये बंदिस्त करून आठवणी तयार करत असतो आपण.. जरा काही वेगळं, घडत असेल, काही आनंदाचे क्षण लगेचच कैद करून..दुसऱ्याच क्षणी सर्वांपर्यंत पोहोचवला जातो...हेच बघा ना काल वाढदिवशी बहिणींनी दिलेल्या भेटवस्तू पाहून सहाजिकच आनंद तर झालाच पण थोड्याच वेळात हा आनंद सर्वांपर्यंत पोहोचलाही (WhatsApp ची कृपा)... अन वाटलं कसं ना अगदी सहजच आपण आपल्या ह्या आठवणी कॅमेरामध्ये कैद करतो आणि सर्वांना दाखवतोही... फोटो हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनून जातो...
तर आजचा हा विषय आमच्या खास दिवसासाठी खास आठवण म्हणून माझ्या जुळ्या बहिणीला वाढदिवसाची आठवणीतली भेट...
नाही म्हटले तरी अर्थातच आपले एकत्र खूप फोटो आहेत..आणि त्या सोबतच्या आठवणी शब्दांत सांगायचं तर बापरे... खूप आहेत...लहानपणीचे तर इतके मजेशीर फोटो आहेत की काही फोटोंवर तर आपण ही मी नाही म्हणून एकमेकींना दरवेळी नव्याने चिडवतो नाही...( जुळ्या असल्याचा फायदा...लहानपणीच्या सर्व फोटोंसाठी आणि त्या गोड आठवणींसाठी आई-बाबांचे आभार मानावे तेवढे कमी..)
आपल्याच नाही तर सर्वांच्याच अशा काही आठवणींमधील गंमत मांडण्याचा हा एक नवाच प्रयत्न...ह्या फोटोंमुळेच खूप काही शिकतो.. जगासमोर आणू शकतो.... किती प्रगत झालं आहे सर्वच....पण पुर्वी असं नव्हतं...
लहानपणी आमच्याकडे एकमेव कॅमेरा होता.. त्या वेळी रोल टाकून फोटो काढले जायचे मग त्या फोटोंसोबत मिळणारी (निगेटिव्ह कॉपी) प्रतही जपून ठेवली जायची.. इतकचं काय अजूनही कधी जुने फोटो पाहताना सोबतच्या ह्या प्रतीतून दिसणाऱ्या अस्पष्ट आकृत्या पाहण्यात गम्मत वाटतेच ना..😁😎
वाढदिवस, सहल , लग्न किंवा विशेष समारंभातच फोटो काढले जाई... आता मागे वळून बघताना ते अल्बम पाहताना दिवस कसा निघून जातो ते कळतच नाही.. बापरे केवढे अल्बम आहेत.. त्यातले क्षण तर आत्ता घडत आहेत इतके ताजे वाटतात.. अतिशयोक्ती वाटेल काहींना पण ते अल्बम पहायला बसलो की एरवी हिरव्या- निळ्या पडद्यावर नजर रोखून असलेले आपण ते फोटो पाहताना स्मार्टफोन हा प्रकारच विसरून जातो...
असचं काहीसं माझ्याबाबतीतही म्हणता येईल... हल्ली फोटो काढण्यातली आवड वाढू लागली असली तरी..त्याची सुरुवात एकाला फोटो काढताना पाहून झाली... ती व्यक्ती दुसरं- तिसरं कोणी नाही.... तर जिच्यासाठी हा नवा प्रयत्न तीच माझी जुळी बहीण निसर्गा... आता नावातच निसर्ग आहे म्हटल्यावर मी निसर्गाच्या सानिध्यात कायम असते हे सांगायला नकोच.. गंमतीचा भाग सोडा पण खरोखरच आम्हाला निसर्गातील विविधतेची आवड असल्यामुळेच बहुदा जास्तीतजास्त फुलांचे, पक्ष्यांचे फोटो काढायला आवडतं...असच आम्ही एका निसर्गरम्य ठिकाणी गेलो असता.. ती खिडकीपासून अगदी जवळच असलेल्या झाडाच्या फांदीवर बसलेल्या त्या इलुश्या पक्ष्याचा फोन मध्ये फोटो काढत असतानाचा मी तीचा सहजच गंमत म्हणून काढलेला तो फोटो... हा तोच त्यानेच मी हळूहळू फोटो काढायला सुरुवात केली... आणि आज ती एक विशेष आवडती गोष्ट आहे माझी.... तर हा फोटो चुकून जरी हरवला तरी कायम तसाच्या तसा डोळ्यांसमोर दिसणारच ह्याची खात्री आहे मला....अन त्यानंतर एकदा खिडकीत purple sunbird नावाचा छोटासा, सुमधुर आवाजाचा, लाजरा पक्षी बसलेला दिसला तेव्हा तिने लगेचच त्याचा फोटो काढला..अन दुसऱ्याच क्षणी तो उडूनही गेला.. पण अशी दुर्मिळ आठवण आमच्याकडे तिच्यामुळे कायमची राहिली... हा दुसऱ्या प्रसंगानेही माझ्यातला छायाचित्रकार आणखी थोडा जागा झाला...अन मग क्लिकक्लिकाटाची गाडी सुरू झाली (फक्त सुरुच झाली हा.. अजून जम बसायला भरपूर शिकायचं आहे) तर ह्या साठी मी तिचे कधी आभार मानणार नाही; ह्या ऋणातच रहायला आवडेल..
लहानपणीचे आमच्या दोघींचे , आमच्या तिघींचे कित्येक गोड आणि मजेशीर फोटो...आई-बाळाचा असा खास फोटो प्रत्येकाकडे असतोच तसा माझा आई सोबतचा फोटो 😍😘😇😍आणि तिचाही आईसोबतचा फोटो...ताईचे आई सोबतचे फोटो..आई सोबतचे असे कित्येक गोड फोटो...बाबांसोबतचे आमचे फोटो.... 😍😘दोघींसाठी आणलेले दोन केक कापतानाचा फोटो...हुबेहूब त्याच मुद्रेत बसून दोन वर्षांपूर्वी काढलेल्या फोटो चा प्रयत्न(पण लहानपणीचाच खूप छान आहे.)एका विशिष्ट लकबीत बसलेलो असतानाचा आमच्या दोघींचा फोटो...ताईच्या वाढदिवशी ती केककडे निरागसतेने पाहतानाचा तिचा फोटो( खास आवडता )....ताईचा बालक रुपातला गोंडस फोटो... त्यावेळच्या जवळपास सर्वच फोटोंमध्ये तिचा खेळण्यातला हत्ती जसं काय आपलाच फोटो काढत आहेत अशा मुद्रेत बसलेला आहे ते सर्वच फोटो😁😀😛, पार्ले -जी बिस्किट खातानाचा आमच्या दोघींचा बाबांनी काढलेला फोटो😍😀(तो पाहील्यावर आजही आम्ही पार्ले ची जाहिरात करत होतो की काय असं वाटतं..सोप्या शब्दांत सांगायचं तर candid click..) दोघी एकमेकींवर रुसुन- फुगुन बसलोय तर बाजूला ताई मस्त फोटो साठी हसते आहे( सर्वात आवडता फोटो...), आम्हा त्रिकुटाचे खूप सारे फोटो... शाळेत पहिलीतला आम्हा पूर्ण वर्गातल्या साऱ्यांचा आईने आवर्जून काढलेला फोटो..😍😊😘आजी- आजोबांसोबतच्या गोड आठवणींचे, गच्चीवरच्या झाडांवरची फुलं पाहतानाचे, मावस भावंडांसोबतचा टेबलवर आम्ही साऱ्या बच्चेकंपनीचा खेटुन बसलेला फोटो....
नातेवाईक तर सर्वांनाच असतात पण असं कुटुंब जे रक्ताच्या नात्यापलिकडचं..ज्यात मैत्री इतकाच गोडवा तर असतोच शिवाय मनापासून आपलं मानणारं असं नातं जे शब्दांत सांगणं खूपच कठीण..अशा आमच्या कुटुंबाचे (Best of Best Family) सर्वच फोटो... 😍😘😇😄
कुटुंबासोबत केलेल्या वेगवेगळ्या सहलींचे फोटो... शाळेतल्या सहलीला गेल्यावर एकाने कॅमेरा आणला होता, तेव्हा काढलेले फोटो; जे आजतागायत पहायला मिळाले नाही...एव्हढचं काय पण लहानपणापासून आत्तापर्यंतच्या ओळखपत्रांवरचे स्वतःचेच फोटो हा प्रत्येकाचा एक गंमतीचा भाग आहे..एखादा छान फोटो साठी ऊभा असताना मित्रांनी मध्येच घुसणं असा जवळपास सर्वांचाच अनुभव असतो; तरी ते फोटो ही प्रत्येकाच्याच आवडीचे असतात...
पहिल्या फोनमधून काढलेला; रांगोळीचा पहिला फोटो...मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतः लावलेल्या झाडांवर उमललेल्या फुलांसोबत टोमॅटो आणि मिरचीच्या फुलांचे; नंतर मिरच्यांचे फोटो तर अगणित आहेत..झाड लावल्यानंतर तब्बल तीन- साडेतीन वर्षांनी त्यावर उमललेल्या पहिल्यावहिल्या अनंताच्या फुलाचे फोटोपानावरच्या दवबिंदूचा फोटो... गुलाबाच्या पाकळीवर पडलेल्या त्या अलुवार थेंबाचा फोटो... गणेशोत्सवात गावासोबत मुंबईतल्या वेगवेगळ्या गजाननाच्या रुपाचे फोटो... दिवाळीतल्या पणत्यांचा फोटो(विशेष आवडी पैकी एक..), भटकंतीवेळी काढलेले फोटो.. आयुष्यातील पहिलावहिला ट्रेक- लोहगडाच्या शिखरावर चिंब पावसातला ढग आणि धुक्यांच्या चादरीत शिरुन काढलेले फोटो..प्रत्येक ट्रेक पूर्ण झाल्यावर गडाच्या शिखरावर तिरंग्यासोबतचे फोटो...रतनगडावरच्या सोनकी नामक छोट्या फुलांच्या पसरलेल्या चादरीचा फोटो..(विशेष आवडता- त्यातून दिसणाऱ्या आभासी आकृत्या तर एका मित्राने दाखवल्या मला, मीच काढलेल्या छायाचित्रातलं वैशिष्ट्य मला दिसलं नव्हतं आधी )शाळेतल्या खास मैत्रिणींना नववर्षाच्या दिवशी फक्त गप्पागोष्टीसाठी बऱ्याच वर्षांनी भेटलो तेव्हाचे फोटो..मैत्रीणीच्या लग्नातला आत्तापर्यंत मी काढलेला पहिलाच candid आणि छान आलेला फोटो... मैत्रीणी सोबत केलेल्या सहलींमधले गंमतीशीर.. ते दिवस पुन्हां पुन्हां आठवायला लावणारे फोटो...मित्र- मैत्रीणींसोबतचे असंख्य फोटो.... एकदा विद्यापीठात एका कार्यक्रमानिमित्त जाणं झालं असता आम्ही साऱ्या जणींनी महाविद्यालयात तर नेहमी सोबत असूनही एकदाही काढला नव्हता; ह्याची भरपाईच जणू... आम्ही विद्यापीठातल्या निसर्गरम्य वातावरणात भरपूर काढलेले फोटो( दुर्दैवाने ह्यातील एकही फोटो आत्ता माझ्याकडे नाहीत)....
बाबांचा ते जेव्हा मित्रांसोबत सहलीला गेले होते तेव्हा समुद्राच्या पाण्यात कॅमेराचं कव्हर शोधतानाचा एक मस्त फोटो... गावात कधीही जा.. गावच्या वातावरणाची ऊब त्या फोटोंतही जाणवते...गावची विशेष आठवण म्हणजे कधी गेलोच की सकाळीच भटकंतीला निघाल्यावर वाटेत असणाऱ्या त्या काळ्या मोठ्या खडकावर आवर्जून दरवर्षी भावंडांसोबत काढलेले फोटो...कोकणातल्या गणेशोत्सवाचे फोटो...बाप्पाच्या वरदहस्ताचे, मोदकाचे तर असंख्य फोटो...गणेशोत्सवात बाप्पाला वाहिलेल्या १२१ मोदकांच्या नैवेद्याचा फोटो..हल्लीच हरिश्चंद्रगडावर काढलेला शेकोटीचा फोटो...कोकणकड्यावरून पाहिलेल्या सुर्यास्ताचा फोटो...कोकणकड्यावर रखुमाईच्या मुद्रेत उभी असलेल्या मैत्रिणीचा फोटो...तंबूत रहायच्या पहिल्यावहिल्या आठवणींचे फोटो...नुकत्याच भावंडांसोबत पहिल्यांदाच केलेल्या सहलीतले मजेशीर फोटो...एका खास ताकाचा फोटो..पुण्यातल्या एका गंमतीशीर पाटीचा फोटो...आदगावच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्याचा तेथून दिसणाऱ्या सुर्यास्ताचा फोटो... मांजरीच्या इलुश्या पिल्लांचा काढलेला फोटो... माझ्या आवडत्या चिमणींचे मी काढलेले काही फोटो...अन ट्रेकला भेटलेली अन नंतर फक्त दोनदा भेटलेली अशी पण तरी जवळची वाटावी अशी; प्रत्येकाला मनापासून दाद देणारी आमची मैत्रीण स्नेहल तिच्यासोबत अन आमच्या बालमित्रासोबत साजरा केलेला नववर्षाच्या दिवसाच्या अमूल्य आठवणींचे...भटकंतीच्या कुटूंबात तर एकाहुन एक सुंदर फोटो काढणारे कलाकार म्हणजे विपूल, दुर्गेश, सत्या, स्नेहल, प्रदीप, प्रतिक, अमित, गौरव अन बरेच जण त्यांचा कॅमेरा तर आठवणींचा खजिनाच तयार करत असतो.. असे असंख्य फोटो... सांगत बसले तर खरचं एक मोठा अल्बम तयार होईल.ज्याचा आकार आपण नाही ठरवू शकत...
तर हे तर आठवणींमधले फोटो केव्हाही बघता येतात.. असेच काही फोटो तर काही अस्पष्ट पण डोळ्यांच्या लेंस ने काढलेले फोटो जे पुढे जाऊन कधी पाहता येत नाही पण कायम लक्षात राहतात... असे काही क्षण ज्यांचे फोटो काढायचे राहून गेले आणि काही असे जे मी काढले नाहीत पण त्यामुळे माझी ही लेखनाची आवड कायम जपता येतेय असे आमच्या गोड भावाने- दुर्गेश ने काढलेले फोटो तर कायम मनाशी गुजगोष्टी करायला भाग पाडतात अन शब्दांत व्यक्त होतात. त्याने काढलेले गणेशाचे, देवींचे फोटो तर विशेष आवडीचे; सोबत चतुराचा, काचेवरच्या दवबिंदूचा, प्रतिकूल परिस्थितीतही मासेमारी करणाऱ्या कोळ्याचा, वारीतल्या डोंबाऱ्याचे खेळ करणाऱ्या बेधडक चिमुरडीचा, त्याच्या छोट्या गोड भाचीचे असे जवळपास सर्वच फोटो खूप आवडीचे आणि माझ्यासाठी आठवणींचा खजिनाच आहे....
तु फोनमध्येही काढलेले फोटो छान असतात; छायाचित्रण शिक - चालू ठेव- असं सतत सांगाणारा आम्हा दोघींचा बालमित्र स्वप्निल जो स्वतःही खूप छान फोटो काढतो... ज्याला आम्ही प्रत्यक्ष तब्बल १०-१२ वर्षांनी भेटलो जेव्हा त्याने इतक्या वर्षांनंतरही मैत्रीवरचा विश्वास ठेवून त्याचा कॅमेराही सरावासाठी दिला..तेव्हा काढलेले फोटो.. पण आपण इतक्या वर्षांनी भेटलो होतो तरी त्यादिवशी फक्त आपल्या तिघांचा राहून गेलेला फोटो ( खरंतर सेल्फी).
महाविद्यालयात सर्वात प्रथम भेटलेली मैत्रीण..आम्ही एकाच वर्गात जरी नसलो तरी रोज आणि सुट्टीच्या दिवसांत फोनवर तासनतास बोलायचो अशी गोड मैत्रीण तिच्यासोबतच्या आठवणी खूप पण माहीत नाही का पण तिच्यासोबत एकही न काढलेला फोटो.. असेच महाविद्यालयातल्या अनेक मित्र- मैत्रीणींसोबत काढायचे राहून गेलेले फोटो..
तर दररोजच्या रहाटगाडग्यात गुंतलेलो असताना समोर असे प्रसंग सर्रकन पुढे जातात अन वाटतं अरे ह्याचा काय मस्त फोटो आला असता ना.. जुन्या पोस्टबॉक्सवर कुणी तरी कांदेपोह्याची ताटली टाकून गेलं होतं अन एरवी मांसाहरी वाटणारा कावळा त्या पोह्यांवर मनापासून ताव मारताना दिसला... तर हल्लीच्या उन्हात जिथे मनुष्य हतबल होतो तिथे पक्षीप्राण्यांची काय वेगळी अवस्था असेल हे रस्त्यावरच्या फळ विकणाऱ्या गाडीवरुन कलिंगडाचा तुकडा पळवून वर कठड्यावर बसून मजेने खाणाऱ्या आणखी एका कावळ्याकडे पाहून जाणवलं...
आणखी एक मजेशीर आठवण..
लहानपणी चित्रांच्या, गोष्टींच्या पुस्तकात नेहमी एका फुगेवाल्याचं चित्र असायचं..
ढगळ लेंगा-सदरा- वर गोल कापडी पातळ टोपी घातलेला, चेहऱ्यावर मोठी दाढी अन् एका हातात फुग्यांनी भरलेली काठी...भोवती जमलेल्या चिमुकल्यांना तो आनंदाने फुगे देतोय असं ते चित्र... जवळपास प्रत्येकाने पाहिलं असेल...
काहींना काल्पनिक वाटेल; पण काही महिन्यांपूर्वी याचि देही याचि डोळा पाहीलेला हा प्रसंग...कामावर जात असताना त्या दिवशी जरा घाईतच होते..गेट मधून बाहेर पडले अन थबकलेच पाहते तर काय...😱लहानपणी पाहीलेलं ते फुगेवाल्याचं चित्र प्रत्यक्ष समोर सजीव रुपात पाहत होते...हो तेच चित्र जसंच्या तसं....हुबेहूब..अगदी चित्रातल्याप्रमाणे विशिष्ट लकबीत हलकासा वाकून फुगे विकत होता आणि भोवती काही चिमुकली फुग्यांसाठी उड्या मारत होती...मला खूप गंम्मत वाटली..😃😃😀 अरे हे मी काय पाहतेय.. एखाद्या दंतकथेमध्ये शोभावा असा प्रसंग...घाईत होते पण तरी थांबून थांबून तेच दृश्य पाहत होते.. जवळ फोनही होता.. वाटलं काढुया का ह्या 'चित्रा'चा फोटोपण घाईत असल्याने पाय पुढे पुढे जात राहीले.. मी त्या 'चित्रातल्या' फुगेवाल्याला सारखं मागे वळूनवळून पाहत आपल्या वाटेने गेले अन् तो फोटोही काढायचा राहूनच गेला..दुर्मिळ 'चित्र' आठवण बनून राहिलं....
जिथे आपणही दररोजच्या लोकलच्या वारीत स्थानकावरच्या धावपळीत दमून जातो तिथे एक साधारण ७०तील असावी बहुदा; अशी एवढ्या वयातही ताठ, आणि चुणचुणीत अशी आजी पुलावरून सर्रकन धावत उतरून गेली.. आणि तिथे असणारा प्रत्येकजण मागे वळून आश्चर्याने आणि कौतुकाने पाहत राहीला..
प्रत्येक ट्रेक ला गेल्यावर नाही म्हटलं तरी फोटो हे काढले जातातच पण भर पावसातला चिंब असा हुडहुडी कायम लक्षात रहिलेला, प्रतिकूल परिस्थितीतही पूर्ण केलेला हरीहर गडचा ट्रेक - त्या ट्रेकला ह्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कायम आठवणींनाही चिंब करतो..ह्या वेळी मला एकही फोटो काढता आला नाही.. एक अनुभव सांगायचा तर जिथून त्या ८०° कोनातल्या पायऱ्या चालू होतात तिथे पायथ्याशी पोहोचल्यावर तर मुसळधार पाऊस अन प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोरात ह्या पायऱ्या चढणं खूप कठिण होतं.. तिथे जरा बसून त्या पायऱ्यांकडे बघताना तो अभेद्य गड त्याचं ते रूप.. जणू विठुराया उभा आहे अन सांगतो आहे.. घाबरू नका मी आहे ईथपर्यंत येऊन माघारी जाऊ नका पूर्ण गड सर करा..असा तो अनुभव कायम मनाशी कोरला गेला आहे.. अन आधी खरोखरच घाबरलेले आम्ही काही जण सर्व ताकदीनिशी पाऊस-वाऱ्याचा सामना करत सर्वांनीच गड सर केलाही.. त्या क्षणांचे.. एकाच्या waterproof फोन मध्ये फोटो तर काढलेच.. पण त्या संपूर्ण ट्रेक मध्ये मला एकही फोटो फोन मध्ये बंदिस्त करता आला नाही...
तर असे अनेक प्रसंग जे डोळ्यांच्या लेंस मध्ये कैद होतात पण प्रत्यक्षात नंतर ते पाहता येत नाही... सगळेच ' दाखवता' नाही आले.. पण काही आवर्जून 'दाखवले'...
शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्याच जवळच्या असतात... तश्याच शाळेतल्या खूप मैत्रीणी आम्हा दोघींच्या जवळच्या आहेत.. त्यातील एक वर्गातच काय जाता- येताना तर कायम सोबत असणारी चैत्रयी, तिच्या सोबतचे क्षण, मस्ती तर बापरे.. तेव्हा जवळ आत्तासारखा फोन असता तर त्या आठवणी फोटोंमध्येही साठवल्या असत्या नाही?, एका बाकावर आमच्यासोबत असणारी सुप्रिया अन अगदी बालवाडी पासून एकाच वर्गात असणारी भाग्यश्री ह्या दोघींसोबत तर वर्गाच्या समूह फोटो सोडता एकही फोटो नाही...
आमच्या शाळेतल्या मैत्रीणींपैकी खूप जवळच्या मैत्रीणींपैकी ज्योत्स्ना आणि स्नेहल ज्यांनाही आम्ही बऱ्याच वर्षांनंतर एका ट्रेक च्या निमित्ताने आवर्जून भेटलो.अन इतक्या वर्षांनंतर आम्ही चौघी(मी,निसर्गा, स्नेहल,ज्योत्स्ना) एकत्र असे खळखळून हसलो (स्नेहलची कृपा), अन मग पुन्हा आमची मैत्री ची वीण घट्ट होत गेली... असेच नंतर स्नेहलने आम्हाला हट्टाने अचानक भेटायला बोलवलं अन तिच्या आयुष्यात येणाऱ्या वळणाविषयी(लग्नाविषयी) सांगितलं. अर्थातच आम्ही साऱ्या खूप खुष होतो तिच्यासाठी..ह्या नवीन वळणाची कहाणी तर ईतकी मस्त होती की जणू आम्ही सिनेमाच पाहत होतो त्यादिवशी मस्त दिवस होता तरी आम्ही एकही फोटो काढला नाही हे आमच्या कोणाच्याही लक्षात आलं नाही तेव्हां; त्या दिवसाचा तो राहून गेलेला फोटो अन हा इकडे प्रत्यक्ष एकमेव दाखवलेला हा आम्हा चौघींचा विशेष फोटो ... खूप आठवणी जोडल्या आहेत ह्याच्याशी..माझा सर्वात आवडता फोटो आहे..
![]() |
| छायाचित्र सौजन्य : स्वानंदी हाटकर |
फोटोंबद्दल आणि आठवणींबद्दल जरी बोलत असले तरी आत्तापर्यंत ईथे एकही फोटो मी सोबत जोडला नाही कारण ते शब्दांतून मांडायचे होते.. पण हा विशेष आवडता अन तिथे जायचं राहून गेलं ह्याची सतत आठवण करून देणारा आहे म्हणून फक्त हा जोडते आहे...
तर हा आगळावेगळा आठवणींचा अल्बम कसा वाटला.. हे नक्की सांगा...आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अर्थातच फोटो 😀😁😍😎सर्व स्विकारले जातील...
तर उत्तम लिहिणाऱ्या माझ्या काही मैत्रीणींना ज्यांचे लेखन काळासोबत पुढे जाताना मागे सुटले आहे त्यांना पुन्हा लेखन चालू करा असं सांगणं आहे...तर... भटकत रहा... आनंदी रहा...लिहित रहा..सोबत अनुभव आणि आठवणी वाढवत रहा...
कारण....
लिहिल्याने अनुभव वाढतो...अन छायाचित्रांनी आठवणी वाढतात..
- ©नंदिनी हाटकर.
अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.
----------------------------------------------------------------------------
'कला' हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏
अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.
कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

मनात दडलेल्या आठवणी
ReplyDeleteसहजतेने कागदावर उतरल्या...
निमित्त ठरले छायाचित्रांचे
अन् हळूहळू बोलू लागल्या...
नंदीनीच्या स्मरणातील त्या
एकामगोमाग एक उलगडू लागल्या...
उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद🙏🏼
न विसरणारा गोकूळ🤪
तूही लिहायला लागलास की...खूपच छान प्रतिक्रिया...तुम्हां सर्वांकडून मिळणारी दाद नेहमीच स्फूर्ती देते..खूप खूप खूप धन्यवाद विसरणाराच गोकुळ😁😀😀
Deleteखूपच छान नंदिनी..🤗🤗 सगळे फोटो डोळ्यांसमोर उभे राहिले.. Thank you.😘😘..
ReplyDeleteपण खरचं तो पक्षाचा फोटो काढतानाचा माझा फोटो मला हवे आहे.. आणि हा लहानपणी चा तो फोटो तुझाच आहे😜🤣 .. बाकी आता सर्व फोटोंवर प्रतिकिया नाही देत😬.. उत्तम आठवाणींचा अल्बम😇🤗...
एक आठवण राहुन गेली.. ती म्हणजे शहाळ्याची पुंगी..😆 आम्ही किहीम बीचवर शहाळे घेतले होते ते इतके भले मोठे होते की आमच्या बटु मुर्तींच्या हातात इतक्या मजेशीर वाटत होत्या की बाबा पटकन बोलले की सगळे पुंगी वाजवणारे वाटत आहेत..😆 आणि खरचं ती पुंगी काही केल्या संपत नव्हती खूप मज्जा आली होती....
😍😘धन्यवाद निसर्गा 😍😘धन्यवाद
Delete☺☺😀😀तो फोटो तुझाच आहे😁😁😄
अन हा खरच त्या पुंगीची आठवण तर कधीच न विसरण्यासारखी आहे...ह्याचा उल्लेख ह्या अल्बम मधे राहीलाच करायचा..😊😊
Apratip....tujamule mala hi parat maza lahanpani kadlelya photos chi atvan zhali..punha ekda manat balpan jaga kelas..kase te chitra vichtra cha mhna photos..bt anand denare..family frnds sobat ghalvle pratek moment camerat capture kelela..aajhi me june album kadhle ki naklat hasu hi yetat ani asu hi..ani tuja hya blog ne..parat tya athvani jagya kelya..thnks..for sharing wth us..nandini..♡♥ :)
Delete😘😍😍😊खूप खूप धन्यवाद रुपाली.. तुम्हां सर्वांच्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत सर्वांना आपलं बालपण आठवावं, मित्र आणि परिवारासोबतचे ते कैद झालेले क्षण आठवावे.. आपल्याजवळच असतात पण त्या वरची धूळ अशी कधी तरी पुसून नव्याने पुन्हां खळखळून हसावे सर्वांनी ह्या साठीचा हा छोटासा प्रयत्न😊😊😍
Deleteखूप छान... खूप वेळा आपण अनुभवलेलं छायाचित्रात उतरवणं राहून जातं. मला तसा अंधारबन आठवतो.. मी एकही फोटो नाही काढला तेव्हा...... फोटोत नाही तर शब्दात उतरावलस हेही नसे थोडके
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मैथिली😊😊 माझ्यासोबत सर्वांच्याच अशा आठवणी ताज्या करण्याचा हा छोटासा प्रयत्न 😊 तुम्हां सर्वांना आवडला हिच पोचपावती..😊खूप खूप धन्यवाद..
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteकाय बोलू खरंच इतक अप्रतिम लिहलयस तोडच नाही गं 👐 👐, माझ्याही मनात हा विषय घुमायचा आणि मनातच ठेवायचे , कित्येक सारे प्रसंग असे मांडलेस तू शब्दांत कि काय सांगु, सर्व बालपणी पासूनचा आपलाच एक चित्रपट पाहतेय असं वाटलं ते सर्वच प्रसंग कायम स्मरणात राहतील 😊
ReplyDeleteछायाचित्र एखाद्या वस्तूची , जागेची, एखाद्याच्या सोबतीची असे काही कैद करत असतो की आजच्या युगात त्याला सीमाच नाही, पण काही जण असे असतात की ज्यांची आपण काही केल्या उणीव भरूच शकत नाही - वाचताना माझ्याही आठवणीत असलेली 'ती' चीच आठवण आली ग -माझी मैत्रीण - पहिली खासम खास सखी- बेस्टफ्रेंड-शाळेत पहिलं टाकलेलं पाऊल आणि पहिला तीचा पकडलेला मैत्रीचा हात- कोणाशी किती मिनिटे- तास- दिवस- महिने - वर्ष सोबत आहोत हे महत्त्वाच नसतं तर त्या व्यक्तीचं महत्त्व खास असतं अशी ती एकमेवच- कायम हसरी - मदत म्हणजे नक्की काय ह्याची परिसीमा नाही अस शिकवून कायम स्वरुपी अनंताच्या प्रवासाला गेलेली ती - नेहमी हसत रहा आणि दुसऱ्यांना आनंदच दे शिकवण देणारी माझी बालमैत्रीण - बावीस वर्षांची सोबत भेटूनही एकही सोबतीने काढलेला फोटो नाही ही खंत मनात कायम राहिलिय , छायाचित्र नाही पण ती नेहमीच आहे- प्रत्येकात मला तीची छोटी छबी भेटते ☺
Khup chaan, photo Ani atavani sagle tuje hote pan lak vachat astna me pan tikade hote asa vata hota mala jasa ki me tujay family la khup javlun olakhate
ReplyDeleteखूप खूप खूप धन्यवाद मयुरी😊😊😍😘 तुम्हां सर्वांना हा प्रयत्न आवडला आणि आपलासा वाटला.. ही खूप मोठी पावती आहे 😊😊😇😇😍😘तुम्हां सर्वांनाही स्वतःच्या अश्या हजारो आठवणी अलुवारपणे ताज्या झाल्या असतीलच...😊😊☺
Deleteफोटो हा विषय तुम्ही किती रंगवून सांगितला आहे. खूप छान
ReplyDeleteभारी छान लिहिले.
ReplyDeleteआवडले.
छान,अगदी स्पष्ट आहेत,हे न काढलेले फोटो,हा अल्बम पहाताना त्या फोटोत आपणही आहोत,अदृश्यपणे असंच वाटत राहिलं.
ReplyDeleteखुप छान लिहले आहे . वाचताना मन रमून गेले आणि मी ही काही न काढलेल्या फोटो मध्ये गुंतून गेलो .
ReplyDelete